Google Search on Budget : अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांच्या आयपॅडमधून काय निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा (Modi Government) हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. या बजेटमध्ये काही गोष्टी महागतात तर काही स्वस्त होता. त्यामुळे या बजेटकडे सर्वसामान्यांपासून अर्थतज्ज्ञ, शेअर मार्केट तज्ज्ञ या सगळ्यांचा नजरा लागल्या असतात. निवडणुकीपूर्वी मतदातांना खूष करण्यासाठी मोदी सरकार कोणत्या कोणत्या घोषणा करणार हे पाहवं लागणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या सर्वसामान्य माणूस बजेटसंदर्भात गुगलची मदत घेतो आहे. तो अर्थसंकल्पाविषयी अनेक गोष्टी गुगलवर सर्च करत आहेत. लोक बजेटच्या संदर्भात Google वर सर्वात जास्त काय शोधत आहे ते जाणून घेऊयात. (budget 2023 What is being searched on Google before the Budget and What did you searching from these 5 things Budget 2023 LIVE Updates marathi news )
बजेट 2023 म्हणजे अर्थसंकल्प...सर्वसामान्य लोक Google वर जास्तीत जास्त बजेटचा अर्थ शोधत आहेत. सर्वसामान्य लोकांना बजेटमध्ये नेमकं काय हे जाणून घ्यायचं आहे. आगामी (Loksabha Elections) लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्वं आहे. तुम्हालाही बजेटसंदर्भातील सर्व बातम्या आणि अपडेट्स या सोप्या शब्दांत समजून घ्यायचा असेल तर Budget 2023 LIVE Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा चौथा अर्थसंकल्प यावर लिंक करा. याशिवाय झी 24 तासच्या Facebook तर ट्विटरवर झी 24 तासच्या Twitter Account वरआणि संसदेतील लाईव्ह दृश्य पाहा झी 24 तासच्या You Tube Channel वर जा.
बजेटच्या अर्थाशिवाय सर्वसामान्य गुगलवर बजेटचे किती प्रकार असतात याबद्दल पण जाणून घेत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, बजेटचे किती प्रकार असतात ते...पहिला प्रकार आहे तो म्हणजे संतुलित बजेट...ज्यात अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न आणि खर्च समानबद्दल माहिती असते. त्यानंतर सरप्लस बजेट...ज्यात सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते. याशिवाय डेफिसिट बजेट असतो. ज्यात सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त असतो.
या दोन गोष्टींशिवाय तिसरी सर्च होणारी गोष्ट आहे अर्थसंकल्पीय सत्र 2023...तर आम्ही तुम्हाला सांगतो अर्थसंकल्पीय सत्र 2023 ला मंगळवारी 31 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा भाषणाने सुरुवात झाली. दरम्यान दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्वसामान्यांना काय स्वस्त आणि काय महाग होणार हे जाणून घ्यायचं असते. शिवाय व्यवसायिक आणि नोकरदार, शेतकरी, महिलांना काय फायदा होणार आहे हे जाणून घ्यायचं असते. त्यामुळे गुगलवर चौथ्या क्रमांकावर शोधलं गेलं ते म्हणजे बजेट 2023 ची तारीख...अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज (1 फेब्रुवारी 2023) सकाळी 11 वाजता संसदेत त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
गुगलवर पाचव्या क्रमांकावर सगळ्यात जास्त शोधलं गेलं ते अपेक्षा...सामान्य लोकांना बजेटकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे ते Google वर देखील शोधत घेतात. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांनाही दिलासा मिळण्याची आशा आहे.