VIDEO : राधा-कृष्णाचा आशीर्वाद असणारी आकाश अंबानीची लग्नपत्रिका पाहिली ?

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. 

Updated: Feb 21, 2019, 10:14 AM IST
VIDEO : राधा-कृष्णाचा आशीर्वाद असणारी आकाश अंबानीची लग्नपत्रिका पाहिली ?  title=

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. यावेळी लग्नाचे हे वारे वाहण्याचं कारण म्हणजे त्यांच्या मुलाचं, आकाश अंबानीचं लग्न. काही दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबीयांनी मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धीविनायक गणपतीचं दर्शन घेत गणरायाचरणी आकाशची लग्नपत्रिका अर्पण केली होती. तेव्हापासूनच त्यांच्या घरी आकाशच्या लग्नविधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. 

सोशल मीडियावर आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नपत्रिकेविषयी बरंच कुतूहल पाहायला मिळालं. सेलिब्रिटींच्या लग्नाविषयीच्या उत्साही वातावरणात लग्नपत्रिकांविषयीही बरीच उत्सुकता असते. नवीन संकल्पना आणि कलात्मकतेची झलक या पत्रिकांमधून पाहायाला मिळते. मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या म्हणजेच ईशा अंबानी हिच्या लग्नाच्या पत्रिकेतही अगदी सुरेख असा संदेश देत पाहुण्यांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे आता आकाशच्या लग्नपत्रिकेचाही थाट पाहायला मिळत आहे. 

अपेक्षेप्रामाणेच आकाशची लग्नपत्रिका खास ठरत आहे ते म्हणजे, त्याची रंगसंगती आणि कलात्मकतेमुळे. एका मोठ्या बॉक्समध्ये ही पत्रिका असून, त्यावर राधा-कृष्णाची चित्र आणि त्यांच्यातील नात्याचं चित्रण केल्याचं पाहायला मिळत आहे. पत्रिकेत राधा-कृष्णाची एक फ्रेम आहे. तर जसजसा तिचा एक- एक पैलू समोर येतो तसतसं त्यातून अंबानी कुटुंबाने अतिशय प्रेमपुर्वक असं आमंत्रण दिल्याचं पाहायाला मिळतं. आकाश आणि श्लोकाच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना अँटीलिया या त्यांच्या निवासस्थानी सुरुवात झाल्याचं कळत आहे. या विवाहसोहळ्याला कलाकार, राजकीय नेतेमंडळी आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थान ईशाप्रमाणेच आकाशचाही विवाहसोहळा पाहण्याजोगा असेल.