वयाच्या 80 व्या वर्षी कॅप्टन यांची नवी इंनिग, नव्या पक्षाच्या नावाची केली घोषणा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Nov 2, 2021, 06:21 PM IST
वयाच्या 80 व्या वर्षी कॅप्टन यांची नवी इंनिग, नव्या पक्षाच्या नावाची केली घोषणा title=

मुंबई : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी त्यांच्या नव्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे. कॅप्टन यांच्या नव्या पक्षाचे नाव 'पंजाब लोक काँग्रेस' (Punjab lok congress) असे ठेवण्यात आले आहे. यासोबतच अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना  (Sonia Gandhi) पत्र लिहून काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादामुळे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करण्याचा कठीण निर्णय घेतला. 

शनिवारी काँग्रेससोबत पडद्यामागच्या चर्चेचे वृत्त फेटाळून लावत, त्यांच्या नव्या पक्षाच्या घोषणेपूर्वी, कॅप्टन म्हणाले होते की, समेटाची वेळ संपली आहे आणि पक्ष सोडण्याचा निर्णय अंतिम आहे. सिंग यांनी आपला राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा आधीच केली होती.