कोंबड्यानं मालकाला पोहचवलं पोलीस ठाण्यात

एका भल्या माणसाला मात्र त्याच्या कोंबड्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढायला लागली

Updated: Feb 4, 2019, 06:51 PM IST
कोंबड्यानं मालकाला पोहचवलं पोलीस ठाण्यात  title=

दीपक अग्रवाल, झी मीडिया, शिवपुरी : पोलीस ठाणं म्हटलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यामुळं पोलीस ठाण्याची पायरी कधी चढायलाच लागू नये असं बहुतांश लोकांना वाटतं. मध्य प्रदेशातल्या एका भल्या माणसाला मात्र त्याच्या कोंबड्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढायला लागलीय. मध्य प्रदेशातल्या फिजिकल पोलीस ठाण्यातील पोलीस एका कोंबड्याचा मालक असलेल्या पप्पू याला स्टेशनमध्ये घेऊन गेले. काखेत कोंबडा घेऊन दिनवाण्या अवतारात पप्पू उभा होता... तुम्ही म्हणाल पप्पूनं काहीतरी गुन्हा केला असेल. पण तसं नाही... हा गुन्हा केला होता पप्पूच्या कोंबड्यानं... पप्पूचा कोंबडा शेजारच्या मुलीला वारंवार चावा घेत असल्याचा आरोप त्याच्या शेजारणीनं केला होता. कोंबड्याविरोधात तक्रार देण्यासाठी ती थेट फिजिकल पोलीस ठाण्यात पोहचली... आणि पप्पूला पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं लागलंय.

हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पप्पूनं कोंबड्यानं केलेल्या चुकीबद्दल माफी मागितलीच... शिवाय पुन्हा कोंबडा चावला तर त्याला विकून टाकण्याचं आश्वासनही त्याला द्यावं लागलंय. 

काही जण उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तर काही जण हौस म्हणून कोंबडे पाळतात. कोंबडा पाळण्याच्या हौसेमुळे पप्पू थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागलीय.