भाजपला झटका, विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

भाजपला पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत झटका बसलाय. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दणका दिला. त्यामुळे काँग्रेस गोठात उत्साहाचे वातावरण आहे.  

Updated: Jun 13, 2018, 05:54 PM IST

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचे महाआघाडी करण्याचे संकेत

बंगळुरु : भाजपला पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत झटका बसलाय. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दणका दिला. त्यामुळे काँग्रेस गोठात उत्साहाचे वातावरण आहे. ही पोटनिवडणूक कर्नाटकमधील जयानगर विधानसभा मतदार संघात झाली. या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत  काँग्रेसचे उमेदवार सौम्या रेड्डी यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा पराभव केला. दरम्यान, या पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांच्या विजयामुळे काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

जयानगर विधानसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजपचे जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी ५४४५७ मते मिळविली. तर, भाजपच्या  बी. एन. प्रल्हाद यांना ५१५६८ मते मिळाली. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. 

गेल्या महिन्यात १२ मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी जयानगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बी. एन. विजय कुमार यांचे निधन झाले. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ११ जूनला मतदान घेण्यात आले होते. यावेळी ५५ टक्के मतदान झाले होते.