२०१९ निवडणुकीआधी काँग्रेसची गुगली

जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याचंही बोललं जातंय

Updated: Aug 4, 2018, 12:11 PM IST
२०१९ निवडणुकीआधी काँग्रेसची गुगली title=

नवी दिल्ली : २०१९ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नवी रणनिती तयार केलीय. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त खासदार त्या पक्षाचा पंतप्रधान होईल अशी गुगली काँग्रेसने टाकलीय. उत्तर प्रदेशमध्ये आघाडी करण्याबाबत काँग्रेसची सपा आणि बसपाशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याचंही बोललं जातंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपच्या जागा शंभरने घटतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधील यांनी व्यक्त केलाय.