'भागवतांनी पंतप्रधान मोदींनाच दिलाय इशारा'

मोहन भागवत यांनी लष्कराबद्दल वक्तव्य करून पंतप्रधान मोदींनाच एकप्रकारे इशारा दिलाय, असा टोला भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हाणलाय.  

Updated: Feb 13, 2018, 11:01 PM IST
'भागवतांनी पंतप्रधान मोदींनाच दिलाय इशारा'

नवी दिल्ली : मोहन भागवत यांनी लष्कराबद्दल वक्तव्य करून पंतप्रधान मोदींनाच एकप्रकारे इशारा दिलाय, असा टोला भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हाणलाय.  

मोहन भागवत यांचे वक्तव्य लष्कराचं अपमान करणारे आणि मुस्लिम समाजात भीती निर्माण करणारे आहे. परंतु यातून भागवत यांना पंतप्रधान मोदींनाच इशारा दिलाय, असं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलंय. 

सरकार विरोधात दलित समाज २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मोठे आंदोलन करणार असल्याच आंबेडकरांनी व्यक्त केलंय.

शत्रूशी युद्ध पुकारण्याची वेळ आली,तर लष्कराला तयारीसाठी सहा ते सात महिने लागू शकतात. पण संघाची शिस्त निमलष्करी दलाप्रमाणे आहे. त्यामुळे कायद्यानं परवानगी दिली, तर संघाचे स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात लढाईसाठी तयार होऊ शकतात, असं मोहन भागवतांनी म्हटलं होतं

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close