तुम्ही Scooty चालवता का? वाहतुकीचे हे नवीन नियम तुम्हाला माहिती आहेत?

तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला 23 हजार रुपयांपर्यंतचे चलन भरावे लागू शकते.

Updated: Jan 25, 2022, 06:01 PM IST
तुम्ही Scooty चालवता का? वाहतुकीचे हे नवीन नियम तुम्हाला माहिती आहेत? title=

मुंबई : लोकांचे हित पाहाता, वाहन कायद्यात नेहमीच काहीना काही बदल होतात. त्यामुळे या नियामांची माहिती प्रत्येक लोकांना असणे आवशक आहे. परंतु वाहन चालकांसाठी हे नियम फार महत्वाचे असतात. कारण त्यांच्या न कळत जर एखादा नियम त्यांनी तोडला तर, त्यांना त्याचे चलन भरावे लागते. आता स्कुटी चालकांसाठी सरकारने एक नवीन नियम आणला आहे. त्यामुळे तुम्ही स्कुटी चालवत असाल किंवा तुमच्याकडे स्कुटी असेल, तर तुम्हाला हा नियम माहित असणे गरजेचे आहे.

नाहीतर तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला 23 हजार रुपयांपर्यंतचे चलन भरावे लागू शकते. नवीन नियमांनुसार तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
स्कुटीसाठी कोण-कोणत्या गोष्टींचे पालन करणे बंधनकारक आहे? आणि असे न केल्यास किती रुपयांचे चलन भरावे लागू शकते. जाणून घ्या

1. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय स्कूटी चालवल्यास  5 हजार रुपये दंड
2. नोंदणी प्रमाणपत्राशिवाय (RC) वाहन चालविल्यास 5 हजार रुपये दंड
3. विमा नसलेले तर 2 हजार रुपये दंड
4. वायू प्रदूषण मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल 10 हजार रुपये दंड
5. हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास 1 हजार रुपये दंड

या सर्व गोष्टींची नियमित काळजी घेतल्यास तुम्हाला कधीही कोणताही त्रास होणार नाही. तसेच 2019 मध्ये नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले. यानुसार गाडी चालवताना फोनवर बोलले तरीही वाहन चालकाचे चलन आता कापले जाणार नाही अशी माहिती मिळाली आहे.

जर एखादी व्यक्ती गाडी चालवताना फोनवर बोलत असेल, तर वाहतूक नियमांनुसार, कोणताही वाहतूक पोलिस त्याचे चलन कापू शकत नाही. जर तुमच्यासोबत असे घडले तर तुम्ही त्याविरुद्ध न्यायालयात अर्ज दाखल करू शकता.

नक्की नियम काय?

जर एखादी व्यक्ती गाडी चालवताना हँड्सफ्री कम्युनिकेशन फीचर वापरून फोनवर बोलत असेल, तर तो दंडनीय गुन्हा मानला जाणार नाही. म्हणजेच फोन डायरेक्ट कानाला न लावता तुम्ही फोनवरती बोलू शकता. यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणताही दंड भरावा लागणार नाही. लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी ही माहिती दिली आहे.