Driving License संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल; पाहा आणि लक्षात ठेवा

Driving License Rules 2024 : वाहन चालन परवाना मिळवण्यासाठी आतापर्यंत अनेक अटींची पूर्तता करण्याची आवश्यकता भासत होती. आता मात्र...   

सायली पाटील | Updated: May 22, 2024, 10:15 AM IST
Driving License संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल; पाहा आणि लक्षात ठेवा  title=
Driving License Rules 2024 latest updates

Driving License Rules 2024 : मागील काही वर्षांमध्ये भारतामध्ये खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कुटुंबांकडे स्वत:च्या मालकीचं वाहन असल्यामुळं रस्त्यांवर दिसणारी वाहनांची गर्दी प्रचंड वाढली आहे. वाहनांची संख्या वाढत असली तरीही देशात होणारे अपघात आणि नियमांची पायमल्ली करून वाहनं चालवणाऱ्यांमुळं अनेक आव्हानं उभी राहत आहेत. ज्यामुळं आता अधिकृतरित्या वाहन चालन परवाना मिळण्यासंदर्भातील नियमांमध्येच बदल करण्यात आले आहेत. 

1 जून 2024 (New Driving License Rules 2024) पासून वाहन चालनाचा परवाना मिळवण्यासाठीचे नवे नियम लागू होणार आहेत. यामध्ये भरधाव वेगात वाहन चालवण्यापासून, वाहन चालनासाठी वयाची अट इथपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. वैध परवान्याशिवाय वाहन चालवणाऱ्यांना 1 ते 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याच्या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरु होणार आहे. 

...तर भरावा लागणार 25000 चा दंड 

बदललेल्या नियमानुसार 18 वर्षांहून कमी वय असणारं कोणीही वाहन चालवताना दिसल्यास 25000 चा दंड ठोठावण्यात येणार आहे. याशिवाय वाहन चालकांचा परवाना  रद्द केला जाणार असून सदर अल्पवयीन चालकाला पुढील 25 वर्षांपर्यंत परवाना नाकारण्यात येईल. नियमानुसार 18 वर्षांनंतर वाहन चालनाचा परवाना मिळत असला तरीही 16 वर्षे झाल्यानंतर मुलांना 50 सीसीहून अधिक क्षमतेच्या वाहनांचा परवाना दिला जाऊ शकते. पुढं 18 वर्षे पूर्ण होताच हा परवाना Update करण्याची तरतूदही उपलब्ध आहे. 

हेसुद्धा वाचा : कोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं? 

दरम्यान, वाहन चालन परवाना मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी करण्याचा हेतू केंद्रस्थानी ठेवत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. ज्याअंतर्गत आता Driving License मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सोपीसुद्धा झाली आहे. कारण, आता RTO कार्यालयात फेऱ्या टाकण्याचा वेळ वाचणार आहे. 

नव्या नियमानुसार परवान्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती आरटीओशी संलग्न नजीकच्या कोणत्याही केंद्रावर जाऊन वाहन चालनाची चाचणी देऊ शकणार आहे. सरकारकडून इथून पुढं ज्या संस्थांना वाहन चालनासाठी चाचण्या घेण्याचे अधिकार दिले आहेत त्यांना प्रमाणपत्रही जारी केलं जाणार आहे. 

Driving License साठी अर्ज करण्याची प्रक्रिया मात्र अद्याप पूर्वीप्रमाणंच राहिली असून, याची सविस्तर माहिती https://parivahan.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. इथंच अर्जदारांना अर्ज करता येणार आहे.