Gold Rate : रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त!

Gold Price Today : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान सोने खरेदीदरांसाठी दिलासादायक बातमी समोर येते. सोन्याच्या दरात घसरण होणार असून ही घसरण कधी होईल? सोन्याचे दर किती असतील? जाणून घ्या सविस्तर बातमी

श्वेता चव्हाण | Updated: Apr 10, 2024, 04:01 PM IST
Gold Rate : रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त! title=

Gold Price Today in Marathi :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ होत आहे.  1 एप्रिलपासून सोन्याचा भाव 4,000 रुपये आणि चांदी 7,000 रुपयांनी महागले.  1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांना खरेदी केले. 2 एप्रिल रोजी 250 रुपये स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी किंमत 750 रुपयांनी वाढली. 4 एप्रिल रोजी 600 रुपये किमतीचे सोने खरेदी केले. 5 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी कमी झाले. 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची खरेदी केली. 7 एप्रिल जैसे थे दर होते.  8 एप्रिल 300 रुपयांनी सोने महागले. 9 एप्रिल रोजी हेच सोने 110  रुपयांनी महागले. तर आज (10 एप्रिल)  22 कॅरेट सोन्याची किंमत 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मात्र आता पुढील काही महिन्यात याच सोने दरवाढीला ब्रेक लागण्यांची शक्यता आहे. 

आज (10 एप्रिल) 24 कॅरेट सोने 71,832 रुपये, 23 कॅरेट सोने 71,544 रुपये, 22 कॅरेट सोने 65,798 रुपये, 18 कॅरेट सोने 53,874 रुपये, 14 कॅरेट सोने 42,022 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाणार आहे. तर  एक किलो चांदीचा भाव 82,100 रुपये आहे. दरम्यान सोन्याच्या किमती वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे भू-राजकीय तणाव असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय मध्यपूर्वेत इराणही इस्रायलच्या विरोधात उभा राहिला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याचा सर्व परिणाम सोन्याच्या दरावर दिसून येतो.  जागतिक बाजारातही सोन्याचे भाव वाढत आहेत. याशिवाय, फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपातीची यूएस सेंट्रल बँकेच्या अपेक्षेचाही परिणाम दिसून येत आहे. 

जूनमध्ये होईल सोन्याच्या दरात घसरण

याशिवाय जून महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, सध्याच्या पातळीपासून सोन्याच्या 6000 ते 7000 रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते. फेडरल रिझर्व्हची बैठक जून महिन्यात होणार असून या बैठकीत फेडच्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती घसरतील किंवा वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  सध्या सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे सोन्याच्या किमतीत सुधारणा दिसू शकते. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत जवळपास 27 टक्क्यांनी वाढ झाली होती, मात्र आता सोन्याच्या दरात सुधारणा होणार आहे.