गुजरात निवडणुक : मोदी, राहुल गांधींच्या आज सभा नाहीत

 येत्या ९ तारखेला  कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्यात ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. 

Updated: Dec 7, 2017, 10:58 AM IST
गुजरात निवडणुक :  मोदी, राहुल गांधींच्या आज सभा नाहीत  title=

गुजरात :  शनिवारी गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. येत्या ९ तारखेला  कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्यात ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. 

दोघांचीही सभा नाही

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेस दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे.

विशेष म्हणजे आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोघे आज एकही सभा घेणार नाहीत.

दुसऱ्या टप्प्याकडे लक्ष

राहुल गांधींच्य़ा प्रचारसभांचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं.  पण आजचा कार्यक्रम उद्यावर ढकण्यात आलाय.

त्यामुळे राहुल आणि मोदींनी आता दुस-या टप्प्यातील निवडणूक प्रचाराकडे आपला मोर्चा वळवलाय. 

स्टार प्रचारक गुजरातमध्ये 

भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक स्टार प्रचारक गुजरातमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

तरीही  आज सगळ्याच उमेदवारांचा भर हा थेट मतदारांपर्यंत पोहचण्यावर असल्याचं दिसत आहेत.