हिमाचल निवडणूक : सुजानपूर : सीएम उमेदवार धूमल ६७० मतांनी मागे

हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ मध्ये सुजानपूरच्या जागेसाठी मोठी टक्कर पाहायला मिळत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 18, 2017, 12:49 PM IST
हिमाचल निवडणूक : सुजानपूर : सीएम उमेदवार धूमल ६७० मतांनी मागे  title=

शिमला : हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ मध्ये सुजानपूरच्या जागेसाठी मोठी टक्कर पाहायला मिळत आहे. 

 भाजपकडून उमेदवार म्हणून प्रेम कुमार धूमल यांच्या विरोधात त्यांचाच शिष्य आणि काँग्रेसचा उमेदवार राजेंद्र राणा यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. गुरू आपल्या शिष्याकडूनच हार मिळवतो की काय अशी परिस्थिती आली आहे. 
धूमल हे काँग्रेसच्या राणाकडून मतांमध्ये मागे असल्याचे दिसत आहेत. आतापर्यंतच्या काऊंटिंगमध्ये धूमल यांना ७५८४ एवढी मत मिळाली आहेत. तर राणा यांना ८२५४ एवढी मत मिळाली आहेत. प्रेम कुमार धूमल हिमाचलमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहे. त्यामुळे त्यांचा विजय होणार की पराजय हे भाजपासाठी सर्वाधिक महत्वाचे असणार आहे. 

गुरू - शिष्याच्या नात्यात असे पडले अंतर?

राजेंद्र राणा हे एकेकाळी धूमल यांचे निटवर्ती समजले जात होते. एक अशी वेळ होती जेव्हा धमूल यांच्या निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी राणा यांच्याकडे असायची. मात्र धूमल सरकारच्या कार्यकाळात शिमलाच्या एका प्रायव्हेट हॉटेलमध्ये झालेल्या अफरातफरीमध्ये धूमल आणि परिवारावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. आणि त्यानंतर राणा आणि धमूल यांच्यातील नात्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर राणा यांनी भाजपाशी असलेलं नात तोडलं. 
२०१२ मध्ये वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा काँग्रेस सरकार प्रस्थापित झाली तेव्हा राणा यांनी त्यांना बाहेरून समर्थन दिले होते. राजेंद्र राणा भाजप सरकारचे माजी मुख्यमंत्री धूमल यांचे अगदी जवळचे होते. तेव्हा धूमल यांनी राणा यांना प्रदेश मीडिया सलाहकार समितीचे चेअरमन बनवले होते. 

राजेंद्र राणाने २०१२ साली विधानसभा निवडणूकीत अपक्ष निवडणूक लढवून मोठ्या मतांनी विजय मिळविला होता. त्यांना २४, ६७४ मत मिळवली होती. तर दुसरीकडे ७३ वर्षीय प्रेम कुमार धूमल हे १९९८ ते मार्च २००३ पर्यंत आणि डिसेंबर २००७ ते डिसेंबर २०१२ पर्यंत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.