'या' बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, FD च्या व्याज दरात वाढ

बँकेकडून वाढवलेल्या FD दारांच्या किंमती 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंत आहे. दारांच्या वाढलेल्या किंमती नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या FD करीता लागू असणार आहेत. 

Updated: Sep 30, 2022, 01:13 PM IST
'या' बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, FD च्या व्याज दरात वाढ title=

मुंबई : देशातील खासगी बँकांमध्ये लोकप्रिय असणारी आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या Fixed Deposit च्या दरांमध्ये वाढ केली आहे. बँकेकडून वाढवलेल्या FD दारांच्या किंमती 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंत आहे. दारांच्या वाढलेल्या किंमती नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या FD करीता लागू असणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि जनरल कॅटेगरीसाठी एकच व्याजदर मिळणार आहे. FD मध्ये केलेली वाढ ही 29 सप्टेंबर 2022 पासून लागू झाली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत 6.25 टक्क्यांचं व्याज FD वर देणार मिळत आहे.

आयसीआयसीआय बँकेकडून (ICICI Bank) 271 दिवसांपासून एका वर्षाच्या FD वर 6 टक्क्यांच व्याज दिलं जातं. त्याचबरोबर, 185 ते 270 दिवसांपर्यंतच्या FD वर 5.50 टक्के, 61 ते 90 दिवसांच्या FD वर 5 टक्के, 46 ते 60 दिवसांच्या FD वर 4.25 टक्के, 30 ते 45 दिवसांच्या FD वर 3.75 टक्क्यांच व्याज दिलं जात आहे. बँकेकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD वर व्याज देत आहे.

नवे नियम

आयसीआयसीआय बँकेनुसार, जर डिपॉजिट करणाऱ्या व्यक्तीने 7 दिवसात संपुर्ण रक्कम खात्यातून काढली असेल तर त्या व्यक्तीला कोणताही इंटरेस्ट मिळणार नाही. FD चा मिनिमम मॅच्यूरिटी पीरियड हा 7 दिवसांचा आहे. वाढलेले नवीन दर हे जुन्या आणि नव्या FD रिन्यूअलवर लागू होणार आहेत.

कोणाला मिळणार वाढीव व्याज?

सेवानिवृत्त व्यक्ती आणि आयसीआयसीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर 1 टक्क्याचा वाढीव व्याज दिलं जाणार आहे. याशिवाय बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर 5 वर्षे 1 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 0.50 टक्के प्रति वर्ष अधिकचं व्याज दिलं जातयं.