जय हिंद! भारतीय लष्कराचं चीनला सडेतोड उत्तर, गलवानमध्ये फडकावला तिरंगा

वाद उकरुन काढणाऱ्या चीनला भारतीय लष्कराने त्याच भाषेत दिलं उत्तर

Updated: Jan 4, 2022, 04:44 PM IST
जय हिंद! भारतीय लष्कराचं चीनला सडेतोड उत्तर,  गलवानमध्ये फडकावला तिरंगा title=

Indian Soldiers With National Flag : भारतीय लष्कराने पुन्हा एकदा चीनला सडेतोड उत्तर दिलं आहे. चीनने केलेल्या चिथावणीखोर कृत्यानंतर भारतीय लष्कराने ड्रॅगनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. चीनपाठोपाठ भारतीय लष्करानेही नववर्षानिमित्त गलवान खोऱ्यात तिरंगा फडकवला आहे. याचे फोटो भारतीय लष्कराने आज प्रसिद्ध केले.

चीनने केली सुरुवात
चीनने नववर्षानिमित्त भारतीय लष्कराला भेटवस्तू दिल्या होत्या. त्यामुळे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर दोन्ही देशांमधला गलवानमध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांकडून शांतता प्रस्थापित होण्याची चिन्ह निर्माण झाली. पण चीनचं शेपूट वाकड ते वाकडच. चिनी लष्कराने पुन्हा एकता भारतीय लष्काराला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. गलवान खोऱ्यातील डेमचोक आणि हॉट स्प्रिंगच्या परिसरात चिनी राष्ट्रध्वज फडकवला. 

चीनच्या सरकारी मीडियाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करताना चिनी लष्कराचे कौतुक केलं.  ग्लोबल टाईम्सने लिहिण्यात आलं होतं, 'गालवान व्हॅलीमध्ये एक इंचही जमीन सोडू नका,'

चीनच्या कारवाया
लडाखमधील पँगोंग-त्सो लेकवर चिनी सेना एक पूल बांधत आहे. 'इंटेल लॅब' या ओपन सोर्स इंटेलिजन्सनुसार, चीन पॅंगॉन्ग त्सो सरोवरावर पूल बांधत आहे जेणेकरून आपले सैन्य सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण भागात सहज पोहोचू शकतील. इंटेल लॅबने या पुलाची उपग्रह प्रतिमाही प्रसिद्ध केली आहे.

दोन्ही देशांचे 50-50 हजार सैनिक सीमेवर तैनात 
गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे प्रकरण समोर आलं होते. ज्यामध्ये भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना चांगलाच धडा शिकवला. यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराने खोऱ्यात 50-50 हजार सैनिक तैनात केले आहेत. गलवानबरोबरच अरुणाचलमध्ये चीनसोबत भारताचा सीमावाद सुरू आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशातील काही भारतीय भागांची नावे बदलली आहेत. अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांसाठी चिनी अक्षरे, तिबेटी आणि रोमन अक्षरांची नावे जाहीर केली आहेत.