कर्नाटक निवडणूक पूर्वीचा एक्झिट पोल आला समोर, धक्कादायक निकालाचा अंदाज

कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया आपले सरकार वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकात सातत्याने दौरा करत आहेत. भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी करत प्रचार सुरु केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 30, 2018, 11:05 PM IST
कर्नाटक निवडणूक पूर्वीचा एक्झिट पोल आला समोर, धक्कादायक निकालाचा अंदाज title=

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया आपले सरकार वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकात सातत्याने दौरा करत आहेत. भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी करत प्रचार सुरु केलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान,  निवडणूक पूर्वीचा एक्झिट पोल समोर आलाय. या पोलमध्ये धक्कादायक निकालाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

१. सीफोर या एजेन्सीने निवडणूक पूर्वीचा सर्व्हे केलाय. एजन्सीच्या सर्व्हेनुसार कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचे सरकार येऊ शकते. मात्र, भाजपच्या पदरी निराशा पडू शकते. राज्यात २२४ विधानसभा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे लक्ष लागलेय.

Siddaramaiah

२. निवडणूक सर्व्हेनुसार १२१ जागा (१०९-१२० जागा) तर भाजपला ४० जागा (४० ते ६० जागा) मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या खात्यात जास्तीत जास्त ६० जागा जाऊ शकतात.

hd deve gowda

३. जेडी (एस) यांच्या विचार केला तर त्यांना या निवडणुकीत ४० जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतरांना १६ जागा तर केजेपीला ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Amit Shah - PM Narendra Modi

४.एजन्सीच्या निवडणूक पूर्वीच्या अंदाजात भाजपची स्थिती चिंता करण्यासारखी असेल. तर काँग्रेससाठी आनंदाचा दिवस असणार आहे.

Amit Shah

५. सी फोरने दावा केला आहे की, प्री पोल सर्व्हे हा टक्के आणि जागांच्या अनुमानानुसार ९५ टक्के खरा राहिलाय. तसेच २०११ मध्ये केरळ आणि पश्चिम बंगालच्या निडणुकीचा जो प्री-पोल सर्व्हे केला तो १०० टक्के बरोबर होता.

pinarayi vijayan

६. एजन्सीने दावा केलाय, २०११ मध्ये केळरमध्ये यूडीएफला ७२-८२ जागा तर एलडीएफला ५६-६८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला होता. वास्तविक निकालात यूडीएफला ७२ आणि एलडीएफला ६८ जागा मिळाल्या होत्या.

C-fore survey

७. हा एक अंदाज आहे. एका सर्व्हेनुसार असे असले तरी निकाल उलटाही येऊ शकतो. १५ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत खरा निकाल स्पष्ट होईल.