कर्नाटक पोटनिवडणूक : भाजपला जोरदार झटका

पोटनिवडणुकीसाठी ६७ टक्के मतदान नोंदवलं गेलं होतं

Updated: Nov 6, 2018, 12:12 PM IST
कर्नाटक पोटनिवडणूक : भाजपला जोरदार झटका  title=

बंगळुरू : कर्नाटकमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. हक्काचा बेल्लारी लोकसभा मतदारसंघ गमवावा लागल्यानं भाजपला जोरदार झटका बसलाय. एकूण तीन लोकसभा मतदासंघापैकी भाजपाच्या ताब्यातील दोनपैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपनं गमावलाय. बेल्लारीची जागा भाजपनं गमावली असून कर्नाटक भाजपचे बडे नेते श्रीरामलू यांच्या बहिणीला काँग्रेसच्या व्ही एस उगप्पांनी पराभूत केलंय. तिकडे विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूकीतही भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. 

या पोटनिवडणुकीत शिवमोगा, बल्लारी आणि मांड्या या तीन लोकसभा मतदारसंघ तर रामनगर आणि जामखंडी या विधानसभेच्या दोन जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं होतं. 

या निवडणुकांकडे सत्ताधारी काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या एकीच्या लोकप्रियतेची परीक्षा म्हणून पाहिलं जातंय. पोटनिवडणुकीसाठी ६७ टक्के मतदान नोंदवलं गेलं होतं.