Loan Rate : 'या' बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका

Loan Interest Rate : कर्ज घ्यायच्या विचारात आहात का? आधी सारासार विचार करा, उत्पन्न नजरेत ठेवा आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घ्या. पाहा ही महत्त्वाची बातमी   

सायली पाटील | Updated: Aug 16, 2023, 11:43 AM IST
Loan Rate : 'या' बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका  title=
Loan interest Rate Hike details HDFC ICICI Bank of Baroda latest update

Loan Interest Rate : घर, वाहन किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करायची झाली, की मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी कर्ज हा एकमेव आणि तितक्याच मदतीचा पर्याय ठरतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कर्जावरील हप्ते/ व्याज वाढल्यामुळं हा पर्यायही हिशोबाचं गणित बिघडवतानाच दिसत आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीमुळं देशातील काही बड्या बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदर वाढवला. तर, काही बँकांनी व्याजर वाढणार असल्याचं म्हणत ग्राहकांना सतर्क केलं. तुमच्या बँकेचा व्याजदर वाढला तर नाहीये? पाहून घ्या... 

HDFC Bank / एचडीएफसी बँक 

एचडीएफसी बँकेकडून निवडक कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 15 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 7 ऑगस्टपासून हे नवे दर लागू झाले आहे. MCLR ते दर असतात ज्यांच्या आधारे बँकेकडून कार, घर किंवा खासगी कर्जाचा व्याजर निर्धारित केला जातो. 

Bank of Baroda/ बँक ऑफ बडोदा 

बँक ऑफ बडोदाकडूनही सर्वसमावेशक एमसीएलआर 5 आधार अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी वाढवण्यात आला. हे नवे दर 12 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले. या वाढीसह बँकेचा वार्षिक एमसीएलआर 8.00 टक्क्यांवर गेला. 

Bank Of India/ बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियाकडून निवडक कालावधीसाठीच्या एमसीएलआरमध्ये वाढ केल्यानंतर ओवरनाईट एमसीएलआर 7.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, तीन आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.30 आणि 8.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

ICICI Bank/ आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेकडून एमसीएलआर 5 अंकांनी वाढवण्यात आला असून, आता या वाढीनंतर त्याचा एकूण आकडा 8.40 टक्क्यांवर गेला आहे. तीन आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.45 आणि 8.80 टक्क्यांवर गेला आहे. 

हेसुद्धा वाचा : ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल; जाणून घ्या नवे नियम 

बँकांकडून अनेकांनीच गृह, वाहन आणि खासगी कर्ज घेतलेलं असताना आरबीआयच्या सातत्यानं बदलणाऱ्या पतधोरणांचा व्याजदरावर थेट परिणाम होतो. मागील काही महिन्यांमध्या व्याजदरांत झालेली वाढ पाहता कर्जसाठी विचारणा करणांचीही द्विधा मनस्थिती झाल्याचं पाहायला मिळत आहे.