स्मार्टफोनसाठी खोटं बोलून Blood Bankमध्ये पोहोचली तरुणी; पैसे मागताच समोर आलं धक्कादायक सत्य

स्मार्टफोन न मिळाल्यास काही मुलं टोकाचं पाऊलही उचलतात

Updated: Oct 20, 2022, 09:54 AM IST
स्मार्टफोनसाठी खोटं बोलून Blood Bankमध्ये पोहोचली तरुणी; पैसे मागताच समोर आलं धक्कादायक सत्य title=
(फोटो सौजन्य - Reuters)

एक स्मार्टफोन (Samartphone) स्वतः जवळ असावा अशी सध्या प्रत्येक तरुणाची इच्छा असते. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात (Maharashtra) एका 11 वर्षीय मुलाने आईने स्मार्टफोन न दिल्याने आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली होती. अनेक मुलं आपल्या पाल्यांकडे स्मार्टफोनसाठी (Samartphone) हट्ट धरून बसल्याचेही आपण पाहिलं असेल. स्मार्टफोन न मिळाल्यास टोकाचं पाऊलही उचलतात. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमध्ये (west bengal) समोर आला आहे. स्मार्टफोन विकत घेण्यासाठी 16 वर्षीय तरुणीने असं काही पाऊल उचललं की ज्याचा कोणी विचारही केला नसेल.

आजतकच्या वृत्तानुसार, हे प्रकरण पश्चिम बंगालमधील (west bengal) दिनाजपूरच्या तपन पोलीस ठाणे परिसरातील आहे. तपन येथील एक 16 वर्षीय तरुणी आपले रक्त (Blood) विकून पैसे मिळवण्यासाठी 30 किमी अंतरावर असलेल्या रक्तपेढीत (Blood Bank) पोहोचली होती. तिने रक्तपेढीच्या (Blood Bank) कर्मचाऱ्यांकडे रक्त देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना वाटले की तिच्या ओळखीचे कोणीतरी रुग्णालयात (Hospital) दाखल आहे. कदाचित ती त्याच्या उपचारासाठी रक्ताच्या (Blood) बदल्यात पैशाची मागणी करत असेल.

मात्र, तरुणीच्या बोलण्यावरून कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ याची माहिती चाइल्ड केअर पथकाला (child care team) दिली. माहिती मिळताच चाइल्ड केअर पथकाच्या सदस्या रीता महतो रुग्णालयात पोहोचल्या आणि त्या अल्पवयीन मुलाली घेऊन गेल्या. यानंतर मुलीने चौकशीदरम्यान जे सांगितले ते ऐकून सगळेच अवाक् झाले.

मुलीने सांगितली सर्व हकीकत 

अल्पवयीन मुलीने सांगितले की, तिला अनेक दिवसांपासून चांगला स्मार्टफोन घेण्याची इच्छा होती. तिने ओळखीच्या व्यक्तीमार्फत ऑनलाइन साइटवरून नऊ हजार रुपयांचा फोन मागवला होता. फोन मागवला, पण तो विकत घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.

तरुणीच्या म्हणण्यानुसार, फोनच्या डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती. पैसे दिले नाहीत तर फोन परत जाईल ही तिला माहीत होते. त्यामुळे आपलं रक्त विकून पैसे मिळवण्याची कल्पना मुलीला आली. दुसऱ्याच दिवशी ती रक्त विकण्यासाठी घरापासून 30 किमी दूर असलेल्या बालूरघाट जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत पोहोचली. रक्त विकून नऊ हजार रुपयांची व्यवस्था करू असे तिला वाटले.

मुलीने सांगितले की ऑर्डर केलेला स्मार्टफोन गुरुवारी, 20 ऑक्टोबरला येणार आहे. त्यानंतर चाइल्ड केअर पथकाने मुलीची बराच वेळ समजूत घातली आणि त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासोबत घरी पाठवले.