कढीपत्ता सांगून करायचे गांजाची तस्करी, ऑनलाइन शॉपिंग साईटवरील धक्कादायक प्रकार

गांजा तस्करीचा गैरप्रकार उघड होऊ नये म्हणून हा गैरप्रकार गेला आणि असं फुटलं बिंग

Updated: Nov 14, 2021, 07:09 PM IST
कढीपत्ता सांगून करायचे गांजाची तस्करी, ऑनलाइन शॉपिंग साईटवरील धक्कादायक प्रकार title=

भिंड: कोरोनामुळे आता बरेच जण ऑनलाइन शॉपिंग साइटवरून सामना घेतात. त्याचं प्रमाण देखील दिवसागणिक वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंग साइटवरून कढीपत्त्याच्या नावावर गांजाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. 

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून कढीपत्त्याच्या नावावर गांजाची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट खाद्यपदार्थांचे वितरण देखील करते. मात्र खाद्यपदार्थांच्या नावाखाली अवैध गांजाची तस्करी होत असल्याने कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

या प्रकरणाची दखल घेत मध्य प्रदेशातील भिंडमध्ये शनिवारी पोलिसांनी ऑनलाइन गांजा विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला. पोलिसांनी टोळीतील दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला.

पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी दोन आरोपींना ग्वाल्हेरमधून अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 किलो गांजा जप्त केला आहे. हा 20 किलो गांजा त्यांनी ऑनलाइन शॉपिंगसाइटवरून मागवला होता. 

विशाखापट्टणम इथून हा गांजा आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या ऑनलाइन इ कॉमर्स कंपनीने बनवाट कागदपत्र तयार करून कढीपत्ता विकण्याच्या नावे गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय सुरु केला होता. ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता.

बृजेंद्र कल्लू नावाचा व्यक्ती या सगळ्या व्यवसायात मदत करत असल्याची टीप पोलिसांना मिळाली. याआधी कल्लू 1 कोटी 10 लाख रुपयांचा गांजा विकून मोकळा झाला होता. शिवाय या सगळ्यातून त्याने ऑनलाइन शॉपिंग कंपनीला देखील मोठा फायदा मिळवून दिल्याची माहिती समोर आली आहे. तर या इ कॉमर्स  वेबसाईटवरही कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.