लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार; जागतिक बाजारात तेल महागलं

Petrol Diesel price hike : 6 मार्चनंतर कोणत्याही क्षणी पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. 6 मार्चला 5 राज्यांच्या मतदानातला अखेरचा टप्पा पार पडत आहे. कच्चा तेलाचे दर 2014 नंतर प्रथमच 100 डॉलरच्या वर  आहेत. 

Updated: Feb 28, 2022, 08:45 AM IST
लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार; जागतिक बाजारात तेल महागलं title=

मुंबई : 6 मार्चनंतर कोणत्याही क्षणी पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. 6 मार्चला 5 राज्यांच्या मतदानातला अखेरचा टप्पा पार पडत आहे. कच्चा तेलाचे दर 2014 नंतर प्रथमच 100 डॉलरच्या वर  आहेत. 

रशिया - युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती कडाडल्या आहेत. कच्च्या तेलाचे दराने पहिल्यांदाच 100 डॉलर प्रति बॅरलचा आकडा पार केला आहे. 

तेल कंपन्यांना एक लीटर डिझेल आणि पेट्रोलमागे 10 रूपयांचा तोटा होत आहे. रूपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण आणि कच्चा तेलाचे वाढते दर यामुळे प्रती बॅरल भारताला 100 डॉलरहून अधिक खर्च येत आहे. 

सरकारने तेलावरचे कर कमी केले तरच दर कडाडण्याचा धक्का थोडाफार कमी होईल. परंतू पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यास देशात पून्हा महागाई वाढू शकते. त्यामुळे निवडणूका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत नक्की किती वाढ होते. हे पाहणं महत्वाचं ठरेल.