प्रफुल्ल पटेल यांनी काढली काँग्रेसची हवा

राष्ट्रपतीपदाची निवडणूक एनडीएच जिंकेल असं प्रफुल्ल पटेल यांनी विधान केलं आहे. तर शरद पवार राष्ट्रपदाची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Updated: Jun 10, 2017, 07:08 PM IST
प्रफुल्ल पटेल यांनी काढली काँग्रेसची हवा title=

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक एनडीएच जिंकेल असं प्रफुल्ल पटेल यांनी विधान केलं आहे. तर शरद पवार राष्ट्रपदाची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक विरोधक जिंकू शकत नसल्याचं विधान करून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसची हवा काढून टाकली आहे. एनडीएकडे संख्याबळ चांगलं असल्यानं राष्ट्रपती निवडणूकीत एनडीचाच उमेदवार विजयी होईल असं भाकीतही पटेल यांनी केलं आहे.