अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी भरला अर्ज

तब्बल 19 वर्षानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 4, 2017, 12:05 PM IST
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी भरला अर्ज title=

नवी दिल्ली : तब्बल 19 वर्षानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. 

राहुल गांधींच्या अर्जावर माजी पंतप्रधान ड़ॉ मनमोहन सिंह आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत. याशिवाय राहुल यांच्या उमेदवारीला काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय. 

याशिवाय काँग्रेस कार्याकारिणीतील बहुतांश सदस्य राहुल गांधींनी अर्ज भरला त्यावेळी उपस्थित होते. आज दुपारी साडे तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. आतापर्यंत राहुल गांधींव्यतिरिक्त एकही अर्ज दाखल झालेला नाही. जर दुपारी साडेतीन पर्यंत अर्ज आले नाहीत, तर राहुल गांधींची निवड बिनविरोध होईल अशीच सध्याची परिस्थिती आहे.