'या' राज्यात १ जुलैपासून शाळा सुरु, ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया

राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या 

Updated: May 11, 2020, 11:35 AM IST
'या' राज्यात १ जुलैपासून शाळा सुरु, ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया  title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आलाय. लॉकडाऊनचा कालावधी संपायला आठवडा भराचा कालावधी आहे. त्यामुळे शाळा-कॉलेज कशी सुरु होणार ? असा प्रश्न अनेकांना पडलाय. यासंदर्भात राज्यस्थान सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. यानुसार राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या केल्या जाणार आहेत. 

राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह दोस्तारा यांनी ५० हून अधिक शिक्षणसंस्थांशी संवाद साधला. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राजस्थानमधील शाळा १ जुलैपासून खुल्या करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. 

राजस्थानमधील शाळा १ जुलैपासून सुरु होणार असल्या तरी शिक्षकांना २६ किंवा २७ जूनपासून शाळेत ड्युटीसाठी हजर राहावे लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल केला जाऊ शकतो. कोरोनामुळे खूप वेळ वाया गेलाय, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु करावी असा सल्ला शिक्षक संघटनेने दिला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रवेश देखील लवकरच सुरु केले जाणार आहेत. इंग्रजी आणि हिंदी माध्यमाची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 

राजस्थानमध्ये बोर्डाच्या परीक्षा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. १० वी आणि १२ वी वर्गाच्या परीक्षांसंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाणार आहे. यावर वेगाने काम केले जाणार आहे.