पार्टनरला चुकूनही बोलू नका 3 शब्द, नाहीतर तुटेल नातं

प्रेमाचे ते 3 मॅजिकल शब्दांपर्यंत ठिक आहे, पण तुमच्या जोडीदाराला हे तीन शब्द कधीही बोलून दाखवू नका

Updated: Jun 14, 2022, 05:04 PM IST
पार्टनरला चुकूनही बोलू नका 3 शब्द, नाहीतर तुटेल नातं title=

मुंबई : कोणतंही नातं टिकवणं म्हणजे तारेवरची कसरत असते पण पार्टनरसोबतचं नातं हे फार नाजूक असतं. छोट्या गोष्टी जास्त ताणल्या तर काहीवेळा नात्यात कटुता येते आणि दुरावा निर्माण होतो. आपल्या पार्टनरशी बोलताना वागताना नेहमी खरं वागावं. पण बोलताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात नाहीतर त्यामुळे नातं संपुष्टात येण्याचा धोका असतो. 

माझं तुझ्यावर प्रेम आहे हे शब्द जसे नात्यात आपुलकी वाढवतात तसेच तीन शब्द नात्यात दुरावाही निर्माण करणारे आहेत. आपल्या पार्टनरला तीन शब्द कधीच बोलू नका नाहीतर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. हे शब्द बोलण्याआधी नक्की विचार करा. 

कधीकधी तुम्ही पार्टनरला असं काही बोलून जाता त्यामुळे पार्टनर दुखावला जातो. त्यानंतर गोष्ट सावरण्यासाठी काहीवेळा रागाने किंवा मनाविरुद्ध आपण ओके, फाइन आणि गुड हे तीन शब्द कधी मुद्दाम तर कधी रागात बोलून जातो. पण हे तीन शब्द नात्यात नकारात्मकता निर्माण करू शकतात. 

कधीकधी या तीन शब्दांमुळे समोरच्याच्या मनात नक्की काय हे समजून घेण्यासाठी संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे दुरावा वाढतो आणि नकारात्मकता अधिक वाढते. हे शब्द वापरल्यानंतर पार्टनरला असं वाटू शकतं की तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करताय किंवा तुम्हाला यावर पुढे काही बोलण्यात स्वारस्य वाटत नाही. 

या शब्दांचा वापर करून पार्टनर नात्यात दुरावा निर्माण करत असतात. जर हा दुरावा तुम्हाला नको असेल तर तुम्ही या शब्दांचा वापर करणं टाळलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पार्टनरशी मोकळेपणानं बोलायला हवं. काहीवेळा ओके, फाइन आणि गुड हे तीन शब्द गैरसमजही निर्माण करतात. 

जेव्हा तुम्ही असे शब्द वापरता तेव्हा तुमचं मन शांत नाही तुमचं लक्षण ठिक नाही हे निश्चित असतं. अनेक वेळा लोक असे शब्द वापरतात आणि आपल्या जोडीदारासोबतच्या एखाद्या गोष्टीबद्दल रागवतात किंवा निराश असतात. अशा परिस्थितीत तुम्ही असे शब्द न वापरता तुमच्या मनाची गोष्ट सांगणे महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास तुमच्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.

या तीन शब्दांमुळे कम्युनिकेशन गॅप तयार होतो. एक प्रकारे इनसिक्युरिटी निर्माण होऊ शकते. नात्यात एकदा अंतर पडलं की ते सावरणं कठीण होतं त्यामुळे अशा प्रकारचे शब्द वापरणं शक्यतो टाळावं.