घोड्यावर स्वार होऊन मुलगी निघाली परीक्षेला

घोड्यावर स्वार असलेली ही मुलगी केरळच्या त्रिशूर भागातली आहे.

Updated: Apr 8, 2019, 03:34 PM IST
घोड्यावर स्वार होऊन मुलगी निघाली परीक्षेला title=

मुंबई : सोशल मीडियाचा क्रेझ जनसामान्यांपासून ते सेलेब्रिटींपर्यत मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक जण इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करत असतात. उद्योगपती आनंद महिंद्रा सुद्धा या कामात बरेच अग्रेसर आहेत. सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असतात. अनेक नवीन गोष्टी ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांनी रविवारी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये एक मुलगी घोड्यावर बसून शाळेत जाताना दिसत आहे. 

महिंद्रांनी युजर मनोज कुमारने केलेल्या ट्विटला रिट्विट केले आहे. मनोजने हा व्हिडीओ आपल्याला व्हाट्सअॅपवर आल्याचे सांगितले आहे. घोड्यावर स्वार असलेली ही मुलगी केरळच्या त्रिशूर भागातली आहे. १०वी च्या परीक्षेसाठी ती जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

आनंद महिंद्रा यांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देताना लिहीले की, 'हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल पाहिजे. कारण हा सुध्दा अतुल्य भारताचा एक भाग आहे. कोणी त्रिशूरमध्ये राहणाऱ्या या मुलीला कोणी ओळखता का? मला माझ्या मोबाईलमध्ये तिचा आणि तिच्या घोड्याचा फोटो स्क्रिन सेव्हर म्हणून ठेवायचा आहे. तिच्या शाळेत जाण्याच्या दृश्याने मला भविष्यासाठी आशावादी बनविले आहे.'