निर्भया : तरूणीच्या गुप्तांगात सापडल्या 2 बिअर बॉटल

बलात्कार करून केली निर्घृण हत्या

 निर्भया : तरूणीच्या गुप्तांगात सापडल्या 2 बिअर बॉटल title=

मुंबई : भोपाळमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. 28 वर्षीय तरूणीवर 17 मे गुरूवारी बलात्कार होऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भोपाळमध्ये वन बेडरूम फ्लॅटमध्ये राहणारी ही मुलगी असून तिच्या घरी मृतदेह सापडला आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे तरूणीच्या गुप्तांगात बिअरच्या दोन बॉटल सापडल्या आहेत. हा प्रकार शवविच्छेदनातून समोर आला आहे.  यातून ही घटना किती धक्कादायक आहे याचा विचारच केला जाऊ शकतो. 

कुठे घडला प्रकार? 

सेहोरे जिल्ह्यातील इच्छावर परिसरारीतल ही तरूणी भोपाळमधील प्रगती नगर परिसरात एका तरुणासोबत राहत होती. या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता तरुणीचा मृतदेह आढळला. घटनास्थळावरील परिस्थिती आणि अर्धनग्न अवस्थेतील मृतदेहावरुन तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनात तिच्यावर अमानूष अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

शेजारच्यांनी दिली ही माहिती? 

गेल्या काही महिन्यांपासून ही महिला या घरात राहत होती. या महिलेसोबत एक तरूण देखील राहत होता. शेजारच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती व्यक्ती या महिलेचा नवरा असू शकतो. त्यामुळे या घटनेनंतर त्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ती व्यक्ती कामगार असल्याच शेजारच्यांनी सांगितलं.  तरुणी ही दिवसभर घरातच असायची. ते दोघेही परिसरातील अन्य मंडळींशी फार बोलायचे नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

पीडित तरुणी ज्या घरात राहत होती त्या घराचा मालक सौदी अरेबियात असतो, असे समजते. शवविच्छेदन अहवालानुसार तिच्या गुप्तांगात बीअरच्या दोन बाटल्याचे तुकडेही आढळले आहेत. भिंतीवर डोक आपटून तिची हत्या करण्यात आली हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलं आहे.