Shraddha Walker Murder Case: ती हाडं श्रद्धाची! श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश आले असून मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून मिळालेली हाडे श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळली आहे.

Updated: Dec 15, 2022, 03:42 PM IST
Shraddha Walker Murder Case: ती हाडं श्रद्धाची! श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट title=

Shraddha Walker Murder Case Update : श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येनं  संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. पोलिसांचा या हत्याकांडाचा तपास वेगाने सुरू असून  पोलिसांची दोन पथकं पाच राज्यात आरोपी आफताबविरुद्ध पुरावे शोधत आहेत. याचदरम्यान श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश आले असून फॉरेन्सिक अहवालानुसार (DNA Report) आरोपी आफताब पुनावालाने (Aftab Poonawala) जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए (DNA) हा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. त्यामुळे आफताबने फेकलेली हाडे श्रद्धाची असल्याचे समोर आले आहे.

श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचा (Delhi Police) तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणी आरोपी आफताब पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आफताबने (Aftab Poonawala) श्रद्धाची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. तसेच त्याने श्रद्धाला मारण्याचा प्लान आधीच केला होता असे देखील त्याने सांगितले आहे. या तपासाला वेग आला असून दिल्ली पोलिसांनी महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून काही हाडे सापडली होती. जंगलात सापडलेली हाडे ही आरोपी आफताब पुनावालाने दिलेल्या माहितीनंतर जप्त करण्यात आली होती.

वाचा: दिल्लीत आफताबचा जुळा भाऊ! बॉयफ्रेंडने 'असा' रचला हत्येचा कट, ऑनलाईन मागवलं अ‍ॅसिड आणि... 

आरोपी आफताबच्या सांगण्यावरून जप्त केलेली हाडे श्रद्धाचीच असल्याचे डीएनए अहवालावरून स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांनी गोळा केलेले नमुने सीएफएसएलकडे पाठवले. आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीचा सविस्तर अहवालही दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या जबड्याच्या हाडासह 13 हाडे सापडली आहेत. #AftaabPoonewala #NewsTakBreaking  

आरोपी आफताबकडून पोलीस चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आफताबविरोधात पुरावे जमा करण्याचे मोठे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते. दिल्लीतील जंगलात आढळलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए जुळला असून ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.  (Latest Marathi News)