प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळा

प्रजासत्ताकदिनाला राजपथावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला गेला. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखणा चित्ररथ उभारला.

Updated: Jan 26, 2018, 11:11 AM IST
प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळा title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनाला राजपथावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला गेला. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखणा चित्ररथ उभारला.

या चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात आली.

शिवराज्याभिषेक सोहळा देखाव्याची वैशिष्टय...

- शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 
- शिवाजी महाराजांच्या न्यायाचे तराजू दर्शवण्यात आले आहेत.
- पताका आणि भाले घेऊन मावळ्यांची प्रतिकृती
- मेघडंबरीत महाराज सिंहासनावर बसलेले दाखवण्यात आले आहे.
- १० जिवंत कलाकार असतील. त्यात  शिवाजी महाराज, जिजाऊ, सोयराबाई, संभाजी महाराज, गागाभट्ट, इंग्रजी अधिकारी सर हेंन्द्री ऑक्सीडन
- राजमुद्रा तसेच शिवराई आणि होण अशी नाणी दाखवण्यात आली आहेत.