रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी चुकूनही करु नका

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रकार घडतात ज्यामुळे आपल्याला अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही सांगणार आहोत. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 19, 2017, 11:32 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी चुकूनही करु नका  title=

मुंबई : आपल्या आयुष्यात असे अनेक प्रकार घडतात ज्यामुळे आपल्याला अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही सांगणार आहोत. 

रात्री झोपताना अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करणं टाळावं अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. अनेकदा लहानशा गोष्टीही आपलं मोठं नुकसान करु शकतात. ज्योतिष शास्त्रातही याचसंदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

असे म्हटले जाते की, ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम होऊ शकतात. तसेच आपण सुख, शांती आणि प्रसन्नता गमावतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या रात्री झोपण्यापूर्वी नाही केल्या पाहीजेत अन्यथा आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात. 

१) रात्री झोपण्यापूर्वी डोक्याजवळ पाणी ठेऊ नका. असे केल्यास मानसिक आजार होण्याची शक्यता आहे असे म्हटले जाते.

२) रात्री झोपताना डोक्याजवळ पर्स, पाकीट ठेऊ नका, यामुळे घर खर्च वाढतो.

३) सोनं-चांदीही डोक्याजवळ ठेवून झोपल्यास सौभाग्य जास्त काळ टिकत नाही. 

४) लोखंडाच्या चावी शिवाय इतर धातुंच्या चाव्या तुमच्याजवळ ठेवून झोपू नका.

५) झोपताना चप्पल, शूज आपल्याजवळ ठेवून झोपल्यास वाईट स्वप्न पडतात.

६) नेलकटर, ब्लेड किंवा कैची सारख्या वस्तू झोपताना जवळ बाळगल्यास शारीरिक शक्ती कमी होते.

७) तुळशीजवळ दिवा दररोज लावावा. मात्र, सायंकाळच्या सुमारास तुळशीत पाणी टाकू नये आणि त्यासोबतच पाणंही तोडू नका.