Stock Market Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 93 अंकांनी घसरला

Share Market Today : जगातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदरात केलेली वाढ, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.   

Updated: Sep 19, 2022, 10:01 AM IST
Stock Market Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला,  सेन्सेक्स 93 अंकांनी घसरला  title=

Share market Update  : बाजार शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. 16 जूननंतर बाजारात शुक्रवारची सर्वात मोठी घसरण होती.  सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर निफ्टीने (nifty) सुमारे 350 अंक गमावले. परिणामी आज, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. 

आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 93.48 अंकांच्या घसरणीसह 58,747 अंकांवर खुला झाला. तर, एनएसई निफ्टी 9.80 अंकांच्या तेजीसह  17,540 अंकांवर खुला झाला. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. 

सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 0.54 टक्क्यांच्या तेजीसह 58,841.33 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 10 अंकांच्या तेजीसह 17,541.10 अंकांवर व्यवहार करत आहे.  INFOSYS, SBI LIFE, ONGC, BAJAJ FINSV आणि HDFC लाइफ हे त्याचे सर्वाधिक लाभधारक होते. त्याच वेळी, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट, सिप्ला, आयशर मोटर्स आणि मारुती सर्वाधिक तोट्यात होते.

गेल्या आठवड्याची स्थिती

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 942.35 अंक किंवा 1.59 टक्क्यांनी, तर निफ्टी 302.50 अंक किंवा 1.69 टक्क्यांनी घसरला. शुक्रवारी सेन्सेक्स 1,093.22 अंकांनी किंवा 1.82 टक्क्यांनी घसरून 58,840.79 वर बंद झाला. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, मजबूत आर्थिक डेटा असूनही भारतीय बाजारातील रोखे उत्पन्नाचा वाढता कल आणि डॉलर निर्देशांक यामुळे इक्विटी मार्केटमध्ये घसरण झाली.