मृत्यूनंतर भिकारी महिलेच्या घरातून मिळाला 'खजीना', त्या तीन बॉक्समध्ये नेमकं काय होतं?

आपल्याला एक ना एक असा व्यक्ति रस्त्यात नक्की दिसतो. जो भिक्षा मागून आपलं पोट भरत असतो.

Updated: Mar 2, 2022, 09:35 PM IST
मृत्यूनंतर भिकारी महिलेच्या घरातून मिळाला 'खजीना', त्या तीन बॉक्समध्ये नेमकं काय होतं? title=

मुंबई : आपण कोणत्याही सिग्नलवरती थांबलो किंवा सार्वजनिक ठिकाणाहून गेलो, तर आपल्याला तेथे एक ना एक असा व्यक्ति दिसतो. जो भिक्षा मागून आपलं पोट भरत असतो. ही भिक्षा मागणाऱ्या लोकांचे कपडे फाटलेले असताता, कधी पायात चप्पल नसते, ज्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती दया येते. ज्यामुळे आपण कधीधी त्यांना दोन-चार रुपये देतो. तर काही लोक खाण्यासाठी काही पदार्थ देतात. ज्यामुळे त्यांना पोट भरण्यात मदत होते. परंतु जर तुम्हाला सांगितलं की, यांच्याकडे लाखो रुपये असतात, तर तुम्हाला विश्वास बसेल? नाही ना, पण हे खरोखर घडलं आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु  एका भिक्षा मागून जगणाऱ्या महिलेकडे तिच्या मृत्यूनंतर लोखो रुपये मिळाले आहेत.

आयुष्यभर भिकार्‍यासारखे जगणारी, फाटके कपडे घालणारी आणि गवताच्या कच्च्या घरात राहाणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घरात लाखो रुपये सापडले, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यापासून लांब राहणारा तिचा मुलगा सगळ्या विधी करण्यासाठी तेथे आला. त्यादरम्यान त्याने आपल्या आईच्या घराची पाहाणी केली असता, त्याला दोन ते तीन ट्रंक मिळाले. ते उघडल्यानंतर या महिलेच्या मुलासह शेजाऱ्यांचे देखील डोळे चक्रावले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील आहे. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये कोनिका महोंतो ही महिला एका कच्च्या झोपडीत राहात होती, तेथे त्यांना लाखो रुपये सापडले.

ही माहिती त्यांचा मुलगा बाबू महोंतो यांनाही दिली होती. मुलगा कुटुंबापासून वेगळा राहत होता. आईच्या निधनानंतर तो अंत्यसंस्काराला आला, पण त्याची आई लखपती आहे, हे त्याला स्वतःला माहीत नव्हते.

आता कोनिका महोंतो यांचा हा पैसा त्यांचं श्राद्ध आणि शांती कार्यासाठी वापरला जाईल. असे त्यांचा मुलगा, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी ठरवलं आहे.