उत्तर प्रदेश निवडणूक निकाल, एमआयएमचं रिपोर्ट कार्ड

विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं पुन्हा एकदा सरशी केली आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 1, 2017, 06:17 PM IST
उत्तर प्रदेश निवडणूक निकाल, एमआयएमचं रिपोर्ट कार्ड  title=

लखनऊ : विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं पुन्हा एकदा सरशी केली आहे. १६ पैकी १४ पालिकांच्या महापौर निवडीचे निकाल आले असून १४ ठिकाणी भाजपचा महापौर झाला आहे. तर १९८ नगर पालिकांपैकी १९७ महापालिकांचे कल हाती आले आहेत. यापैकी ८९ ठिकाणी भाजप, ४२ ठिकाणी बीएसपी, २२ ठिकाणी एसपी आणि ६ ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे.

३४७ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर एसपी १२० आणि बीएसपी ८४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ५४ आणि १५० अपक्ष आघाडीवर आहेत.

एमआयएमनंही खातं उघडलं

उत्तर प्रदेशातल्या या निवडणुकींमध्ये एमआयएमनंही खातं उघडलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये एमआयएमचे १२ नगरसेवक, ५ नगर पालिका परिषद सदस्य, एक नगर पंचायत अध्यक्ष आणि ३ नगर पंचायत सदस्य निवडून आले आहेत.

'आप'नंही जिंकल्या जागा

या निवडणुकांमध्ये आपनंही काही जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार आपचे महापालिकांमध्ये दोन, नगर पालिकेमध्ये सहा, नगर पंचायत अध्यक्ष एक आणि नगर पंचायतीचे १४ सदस्य निवडून आले आहेत.