उरीमध्ये भारताचे पाकड्यांना जशास तसे उत्तर

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या उरीतील कमलकोट भागात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. सकाळी ११ च्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले.

Updated: Oct 22, 2017, 06:52 PM IST
उरीमध्ये भारताचे पाकड्यांना जशास तसे उत्तर  title=

जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या उरीतील कमलकोट भागात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. सकाळी ११ च्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले.

पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनामूळे कमलकोटमधील नागरिकांना घरातच थांबण्याच्या सुचना लष्कराने केल्या आहेत.जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय. 

दहशतवाद्याकडून ग्रेनेड, रायफल आणि पाकिस्तानी चलनी नोटा सापडल्या आहेत. हंदवाडामध्ये हजीन भागात तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.  या माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 
चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्याकडून ग्रेनाईड, रायफल आणि पाकिस्तानी चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. हंदवाडामध्ये एका दहशतवाद्याला घालण्यात आलेले कंठस्नान हे ऑपरेशन ऑलआऊट या भारतीय लष्कराच्या मोहिमेचं यश असल्याचं मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.