Uttarkashi Bus Accident : भाविकांची बस दरीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू

Uttarkashi Bus Accident :उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भाविकांची बस 200 फूट दरीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झाला.  

Updated: Jun 6, 2022, 08:26 AM IST
Uttarkashi Bus Accident : भाविकांची बस दरीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू  title=

नवी दिल्ली : Uttarkashi Bus Accident :उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भाविकांची बस 200 फूट दरीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, उत्तरकाशीमध्ये बचावकार्य आता थांबविण्यात आले आहे.

रविवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे यमुनोत्रीला जाणारी बस  200 मीटर दरीत कोसळून 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार या दुर्घटनेत 26 प्रवासांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ठार झालेले सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी होते.

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील 28 यात्रेकरुंना घेऊन जाणारी बस उत्तरकाशी जिल्ह्यातील दमताजवळ दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पोलीस आणि एसडीआरएफची टीमने बचाव कार्यात मदत केली. अपघातग्रस्त बस हरिद्वारहून निघाली होती. खोल दरी आणि अंधारामुळे मृतदेह रस्त्यापर्यंत पोहोचवण्यात अडचण येत  होती. आतापर्यंत केवळ काही मृतदेह रस्त्यापर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एका ट्विटद्वारे मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातानंतर त्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी केली. याबाबत त्यांनी एक ट्विट करत ही माहिती दिली.