Uttarakhand Exit Poll : भाजपला मोठा झटका, काँग्रेसला मोठा फायदा

Uttarakhand Exit Poll : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याची मोठी उत्सुकता आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे की काँग्रेसचे सरकार स्थापन होणार याची मोठी उत्सुकता आहे.  

Updated: Mar 7, 2022, 07:18 PM IST
Uttarakhand Exit Poll : भाजपला मोठा झटका, काँग्रेसला मोठा फायदा title=

मुंबई : Uttarakhand Exit Poll : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याची मोठी उत्सुकता आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे की काँग्रेसचे सरकार स्थापन होणार याची मोठी उत्सुकता आहे. येथे भाजपला मोठा झटका बसरण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये सत्ता बदलाचे संकेत मिळत आहेत. (Uttarakhand Exit Poll: Big blow to BJP, big advantage to Congress)

Zee Exit Poll 2022 नुसार उत्तराखंडमधील एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती मतं मिळतात? उत्तराखंडमध्ये भाजपला 35 टक्के मतं मिळू शकतात. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला 39 टक्के मतं मिळू शकतात. तर आम आदमी पक्षाला 09 टक्के मते मिळताना दिसत आहेत. बसपाला 08 टक्के मते मिळत आहेत, तर इतरांच्या वाट्याला 09 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी लागणार आहेत. एक्झिट पोलमधून कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची सरकार बनते हे स्पष्ट होत नसले तरी कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे, याचा अंदाज Zee Exit Poll 2022 नुसार नक्कीच येतो.

उत्तराखंडचा एक्झिट पोल - एकूण 70 जागा 

भाजप - BJP - 26-30
काँग्रेस - CONG - 35-40
बीएसपी - BSP - 2-3
अन्य - OTH  - 1-3

 उत्तराखंडचा एक्झिट पोल - मतदान टक्केवारी

भाजप - BJP - 35
काँग्रेस - CONG - 39
आप - AAP - 9
बसपा - BSP - 8
अन्य - OTH - 9