एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? निकालाचा अंदाज कसा लावतात?

What is Exit Poll : मतदान संपल्यानंतर (Assembly Election) आता एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? याचं उत्तर पाहुया...

सौरभ तळेकर | Updated: Nov 30, 2023, 07:29 PM IST
एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? निकालाचा अंदाज कसा लावतात? title=
What is Exit Poll how to calculate

Exit Poll Definition and Meaning : लोकसभेची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालंय. आता सर्वांना प्रतिक्षा लागलीये ती निकालाची... कोणत्या राज्यात कोणाती सत्ता येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल (Exit Poll) आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? याचं उत्तर पाहुया...

एक्झिट पोल म्हणजे काय? (What is an exit poll?)

निवडणूक निकालाचे अंदाज (Predictions of election results) व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणजे एक्झिट पोल. या एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? कोणाची सत्ता येईल? याचा अंदाज लावला जातो, त्याला एक्झिट पोल म्हटलं जातं. एक्झिट पोल हा तंतोतंत असतो. मात्र, हा खरा निकाल असू शकत नाही. एकंदरीत ट्रेंड कोणत्या बाजूला झुकला आहे, याचा अंदाज घेण्यातचं एक माध्यम म्हणजे एक्झिट पोल.

नियम काय सांगतो?

एक्झिट पोलचे निकाल मतदानाच्या दिवशी जारी करता येत नाहीत. एक्झिट पोलचे निकाल जारी करण्यासाठी सर्वेक्षण एजन्सींना निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. लोकप्रतिनिधी कायदा, 19951 नुसार निवडणूक आयोगाने (ECI) अधिसूचित जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यम एक्झिट पोल जाहीर करू शकत नाही. या नियमांव्यतिरिक्त गरजेनुसार निवडणूक आयोगाकडून गाईडलाईन जारी केल्या जातात.

एक्झिट पोल तयार कसे करतात? (How do create an exit poll?)

माध्यम समुह आणि स्वायत्त संस्था यांचा एक प्रतिनिधी काही निवडणूक केंद्राबाहेर असतात. काही मतदारांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून मतदानाबद्दल माहिती घेतात. असे अनेक कल जाणून घेतल्यानंतर संपूर्ण डेटा मोठ्या स्केलवर मोजला जातो. त्यानुसार निकाल कसा लागेल, याचा अंदाज लावला जातो.