पोलीसांच्या झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार

 महाराष्ट्राच्या सीमेलगत छत्तीसगडमध्ये रविवारी दुपारी 3च्या सुमारास पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 19, 2017, 03:54 PM IST
 पोलीसांच्या झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार

राजनांदगाव :  महाराष्ट्राच्या सीमेलगत छत्तीसगडमध्ये रविवारी दुपारी 3च्या सुमारास पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.. 

या चकमकीत 3 नक्षली ठार झाले असून शस्त्रही जप्त करण्यात आली. ठार झालेल्यांमध्ये समीला या महिला कामांडरचा समावेश आहे. तिचा अनेक कारवायांत सहभाग होता.. 

छत्तीसगड पोलिसांची ती मोस्ट वॉन्टेड नक्षली होती. उर्वरित दोन नक्षली हे बस्तर दलमचे असल्याचे सांगितले जात असून त्यांची ओळख पटायची आहे. ही संपूर्ण कारवाई राजनांदगाव पोलिसांच्या इ-थर्टी पथकाची आहे. औंधी पोलीस ठाणे हद्दीत जंगलात नक्षली जमले असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस तिथे पोचले. 

यावेळी नक्षलवादी जेवणाच्या तयारीत होते.  पोलीस पोचताच चकमक उडाली त्यात 3 नक्षलवादी ठार झाले. या तिघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून यात आणखी काही नक्षली जखमी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.