पुण्यात हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून दोन भिकाऱ्यांची केली हत्या

 Hotel owner threw boiling water at beggars In Pune :चीड आणि संतापजनक बातमी पुण्यातून. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.  

Updated: Jun 3, 2022, 11:16 AM IST
पुण्यात हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून दोन भिकाऱ्यांची केली हत्या title=

पुणे : Hotel owner threw boiling water at beggars In Pune :चीड आणि संतापजनक बातमी पुण्यातून. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे. सासवड परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेल चालकाने दोन भिकाऱ्यांवर निर्दयीपणे  उकळते पाणी टाकले. या घटनेत दोन कचरा वेचक भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप असे या गुंड हॉटेल चालकाचे नाव आहे. हे दोन भिकारी जगताप याच्या हॉटेल जवळील ओसरीवर बसत होते. या रागातून जगताप याने भिकाऱ्यांना बेदम मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकले. ही घटना 23 मे रोजी सासवडमध्ये   घडली. गंभीर बाब म्हणजे घटनास्थळापासून सासवड पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही.

काय आहे सासवडमधील घटना ?

पुण्यातील सासवड परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेल चालकाने गरम उकळत पाणी टाकून दोन भिकाऱ्यांची हत्या केली.  या हत्या कांडातील भिकारी हे पपू जगताप याच्या हॉटेलजवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केट जवळ ओसरीवर दररोज बसत होते. याचाच राग मनात धरुन पपू जगताप याने या भिकाऱ्यांना काठीने मारहाण केली. मारहाणीत  निपचीत पडलेले भिकारी अजून कसे गेले नाहीत,  म्हणून पपू जगताप याने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी त्यांच्या अंगावर ओतलं. यात ते पूर्णपणे भाजून निघाले आणि यात तिघांचा मृत्यू झाला. 

ज्या ठिकाणी हे हत्याकांड झाले, त्या ठिकाणपासून सासवड पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी या घटनेकडे ढुंकूनही पाहिले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. या हत्याकांडातील आरोपी पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप हे एका आमदाराचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर येतं आहे. 

याआधी नाशिक शहरात अशाच प्रकारची घटना घडली होती. याबाबत संताप व्यक्त होत होता. दिव्यांग मुलाने खाण्यासाठी अन्न मागितले असता रागवलेल्या हॉटेल चालकाने त्याच्या अंगावर गरम पाणी ओतले होते. या हॉटेल चालकावर गुन्हा दाखल झाला होता. आता पुण्यातही घडना घडल्याने चीड व्यक्त होत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली.