शनि भक्तांवर काळाचा घाला, अपघातात ३ ठार

शनि अमावस्येच्या निम्मीताने शिर्डीहुन शिंगणापुरला जाणार्या शनि भक्तांवर काळाने घाला घालताय.

Updated: Nov 18, 2017, 05:20 PM IST
शनि भक्तांवर काळाचा घाला, अपघातात ३ ठार  title=

मनमाड : शनि अमावस्येच्या निम्मीताने शिर्डीहुन शिंगणापुरला जाणार्या शनि भक्तांवर काळाने घाला घालताय.

शिंगणापुरला जाणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात झाला असून ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. 

३ भक्त ठार 

नगर मनमाड रोडवर राहुरी जवऴ टाटा मँजीक आणि आयशर ट्रक मध्ये भीषण अपघात झालाय या अपघातात ३ भक्तांना आपले प्राण गमवावे लागले आहेत .

टाटा मॅजिक आदळली

 नगर मनमाड रोडवर राहुरी येथील हॉटेल जयश्री जवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रक वर शिर्डी हुन शनि शिंगनापुरला गुजरात आणि नाशिक जिल्ह्यातील भाविकांना घेवुन जानारी टाटा मँजीक गाडी मागून आदळली.

जखमींवर उपचार सुरु 

 यातील ३ साई भक्त ठार झालेत तर इतर  सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर राहुरीतील रुग्णालयात  उपचार सुरु आहेत . शनि शिंगणापुर अवैध आणि भरदाव वाहतुकीने आज आणखी तीघांचा बळी घेतलाय.

आज लातूर निलंगा येथेही अपघात 

लातूर-निलंगा महामार्गावरील चलबुर्गा पाटीमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या बस अपघातात ८ प्रवासी जागीच ठार झाले. तर ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

भरधाव वेगात आलेल्या ट्रकची आणि बसची समारोसमोर धडक झाली. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे बसचा अर्धा भाग पूर्णपणे चिरला गेलाय. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.