पुन्हा जनआंदोलन करण्यासाठी अण्णांची जनजागृती

शेतीचे प्रश्न आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

Updated: Jan 21, 2018, 05:49 PM IST
पुन्हा जनआंदोलन करण्यासाठी अण्णांची जनजागृती title=

सांगली : शेतीचे प्रश्न आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. राज्य आणि केंद्रीय कृषिमूल्य आयोग शेतीमालाच्या दरात ४० टक्के कपात केली.

कृषीमूल्य आयोगाच्या अशा धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही, असा आरोप अण्णांनी केलाय. २३ मार्चला अण्णा दिल्लीमध्ये पुन्हा जनआंदोलन उभारणार आहेत, त्यासाठी जनजागृती करण्यासाठी अण्णांनी सांगली जिल्ह्यातील आटपाटी इथं जाहीर सभा घेतली.

शेतक-यांना बँका कर्ज देत नाही आणि दिलं तर चक्रवाढव्याजापेक्षाही जास्त व्याज आकारतात असे अनेक मुद्दे जनआंदोलनात लावून धरणार असल्याचं अण्णांनी सांगितलं.