औरंगाबाद दंगल नव नवे व्हिडिओ समोर, १० कोटींचे नुकसान

औरंगाबाद दंगल आता शमली असली तरी इंटरनेट सेवा आता सुरु झाली असल्याने रोज नवे नवे व्हिडिओ समोर येत आहेत.

Updated: May 17, 2018, 01:56 PM IST
औरंगाबाद दंगल नव नवे व्हिडिओ समोर, १० कोटींचे नुकसान title=

औरंगाबाद : दंगल आता शमली असली तरी इंटरनेट सेवा आता सुरु झाली असल्याने रोज नवे नवे व्हिडिओ समोर येत आहेत त्यात विध्वंसाच भयानक चित्रण दिसतंय, कशा पद्धतीने दंगलग्रस्त भागात तणाव होता कशी दगडफेक सुरु होती, कसं नुकसान होत होत हे स्पष्ट त्यात दिसतंय. पोलीस आता या सगळ्या व्हीडिओ चा अभ्यास करून दंगल ग्रस्तना अटक करत आहेत. तर झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहेत त्यात प्राथमिक १० कोटींचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.