औरंगाबादमध्ये कचरा कोंडी, टाकायचा कुठे हा पेच!

सलग दुस-या दिवशी कचरा कोंडी कायम आहे. पालिका सलग दुसऱ्या दिवशी ही कचरा कोंडी सोडवण्यात अपयशी ठरली आहे,  शहराचा ४०० टन कचरा कुठं टाकावा हा पेच कायम आहे.

Updated: Feb 17, 2018, 01:08 PM IST
औरंगाबादमध्ये कचरा कोंडी, टाकायचा कुठे हा पेच! title=

औरंगाबाद : सलग दुस-या दिवशी कचरा कोंडी कायम आहे. पालिका सलग दुसऱ्या दिवशी ही कचरा कोंडी सोडवण्यात अपयशी ठरली आहे,  शहराचा ४०० टन कचरा कुठं टाकावा हा पेच कायम आहे.

 कचरा भरलेल्या सर्व गाड्या मनपाच्या सेंट्रल नाका भागात उभ्या आहेत. नारेगाव आणि बाभळगावचा विरोध कायम आहे आणि महापालिकेकडे अजूनही काहीच पर्यायी  व्यवस्था नाही.

शिवसेना भाजपची या महापालिकेत गेली अनेक वर्षे सत्ता आहे. मात्र अजूनही ते हा प्रश्न सोडवू शकले नाही, आणि प्रश्न गंभीर झाल्यावरही ते अजूनही कुठं आहेत हे कळत नाहीये.