मोठी बातमी | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे होते रूग्णालयात दाखल 

Bollywood Life | Updated: Nov 15, 2021, 06:42 AM IST
मोठी बातमी | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन title=

पुणे : वयाच्या शताब्दीकडे वाटचाल करणारे शिव शाहीर, ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून ते निमोनिया सारख्या आजाराने त्रस्त होते. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ते काही दिवसापासून उपचार घेत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 

15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 5 वाजून 07 मिनिटांनी रूग्णालयात निधन झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती देण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पर्वती येथे 8.30 वाजेपर्यंत नेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

इतिहासाच्या अभ्यासपूर्ण लेखनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरात पोहचवण्याचे काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. 'महाराष्ट्र भूषण' ही पदवी महाराष्ट्र सरकारने त्यांना बहाल केली होती.  तब्बल साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी इतिहास संशोधनावर काम केले. 

देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. त्यांच्या निधनाने एक इतिहास तज्ञ गमावल्याची भावना जाणकारांनी व्यक्त केली आहे.