आमदारांच्या घोडेबाजारावर भाजपाची प्रतिक्रिया

 चर्चेत येण्यासाठी काही नेते असे आरोप करत असल्याचे राम कदम म्हणाले. 

Updated: Nov 8, 2019, 01:38 PM IST
आमदारांच्या घोडेबाजारावर भाजपाची प्रतिक्रिया  title=

मुंबई : शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांना भाजपाकडून २५ ते ५० कोटींची ऑफर मिळाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी देखील हाच आरोप केला. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ पसरली. यावर भाजपा नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाकडून नक्की संपर्क कोण करतय ? याची माहिती तुमच्यापर्यंत आली का ? असा प्रश्न राम कदम यांना विचारण्यात आला. चर्चेत येण्यासाठी काही नेते असे आरोप करत असल्याचे राम कदम म्हणाले. 

राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर जाऊ देऊ नका अशी विनंती मी करतो असे राम कदम यांनी म्हटले आहे. ५० कोटींची ऑफर दिली गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यावरही राम कदम यांना प्रश्न विचारण्यात आला. तर भाजपातर्फे अशी कोणतीही ऑफर देण्यात आली नाही. कोणीही असे बिनबुडाचे करु नये. खरे असल्यास ते उघड करावेत असेही राम कदम म्हणाले.

२५ ते ५० कोटींची बोली

२५ ते ५० कोटींची बोली लावली जात आहे. शिवसेनेच्या आमदाराला ५० कोटींची ऑफर दिल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे. 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आमचे कोणतेही आमदार फुटून जाणार नाहीत. जर ते जयपूरला गेले असतील  फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. जर कोणाचे फोन आले तर ते रेकॉर्ड करा. आपण पुरावे गोळा करु आणि त्यांना तोंडावर पाडू असे आम्ही आमच्या आमदारांना सांगितले आहे.