Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."

Devendra Fadanvis On Chandrakant Patil:  चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Updated: Dec 10, 2022, 11:24 PM IST
Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..." title=
Devendra Fadanvis,Chandrakant Patil

Ink Attack On Chandrakant Patil: पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक (Ink Attack) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पैठण येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चंद्रक्रांत पाटील यांच्याविरुद्ध रोष पहायला मिळत होता. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. (chandrakant patil ink throwing in pimpri chinchwad pune  devendra fadanvis has condemned the attack marathi news)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ही दुर्देवी घटना... चंद्रकांत पाटील यांचा आशय समजून घेण्याची गरज होती. त्याच्या एका शब्दाला पकडून त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. माफी मागितल्यानंतर त्यांना निशाण्यावर घेणं, चुकीचं असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. निश्चित बोलताना भान ठेवलं पाहिजे पण जाणूनबुजून टार्गेट करणं ही गोष्ट बरोबर नाही, असंही फडणवीस (Devendra Fadanvis On Chandrakant Patil) म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी स्वत:वर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, असंही चंद्रकांत पाटील यावेळेस म्हणाले आहेत. माझ्यावरचा हल्ला म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. माझ्यावर शाई फेकून ही लोकशाही नव्हे तर झुंडशाही असल्याचं विरोधी पक्षांने दाखवून दिलं. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी घाबरत नाही, असं वक्तव्य देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी केलंय.

आणखी वाचा - Maharastra Politics: "याद राखा...घरात घुसून उत्तर देऊ"; राम कदम यांची थेट धमकी!

दरम्यान, गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत पोहोचला, हे सरंजामशाहीवाल्यांना झेपत नाही. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नसल्याचं देखील पाटलांनी यावेळी म्हटलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जर आम्ही मोकळीक दिली असती तर ते केवढ्यात पडलं?, असा सवाल देखील विचारत त्यांनी संयमाची भूमिका घेतली आहे.