छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३३८ वी पुण्यतिथी साजरी होतेय. यासाठी किल्ले रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

Updated: Mar 31, 2018, 09:16 AM IST
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम title=

रायगड : आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३३८ वी पुण्यतिथी साजरी होतेय. यासाठी किल्ले रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे रसरसंघचालक मोहन भागवत उपस्थित आहेत. याशिवाय पालकमंत्री रवींद्र चव्हाण,  रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. सकाळी शिवसमाधीची महापूजा, त्यानंतर राजदरबारात शिवप्रतिमेचे पूजन होईल. शिवपुण्यस्मृती पुरस्कारांचे वितरण, गडारोहण स्पर्धेचे पारितोषिक वितरण, शिवप्रतिमा मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिवभक्तांनी रायगडावर गर्दी केलीय.