अलिबाग जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा

रायगडमधील गोरगरीब रूग्णांना आता सिटीस्कॅनच्या सुविधेसाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागणार नाही. अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध झाली आहे. 

Updated: Jul 20, 2017, 10:42 PM IST
अलिबाग जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा  title=

अलिबाग : रायगडमधील गोरगरीब रूग्णांना आता सिटीस्कॅनच्या सुविधेसाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागणार नाही. अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध झाली आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ही भेट दिली आहे. या मशीनच्या सहाय्याने संपूर्ण शरीराचे स्कॅनिंग शक्य होणार आहे. सेकंदाला १६ इमेज देणा-या या मशिनने केवळ २० सेकंदात थ्रीडी कलर इमेजचं स्कॅनिंग करता येणार आहे. 

यापूर्वी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडेच असे अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन उपलब्ध होते. आता रायगड जिल्हा रुग्णालयात ही सुविधा रुग्णांना शासकिय नियमानुसार माफक दरात तर गरीब रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोयही टळणार आहे.