शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू

शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू होत आहेत. 

Updated: Sep 8, 2017, 07:30 PM IST

सातारा : शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू होत आहेत. अतिरेक्यांशी लढा देताना, कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नींची जिद्द अखेर कामी येत आहे.

पत्नीच्या निधनानंतर वीरपत्नी स्वाती महाडिक यांच्या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कारण पतीचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करत, देशसेवेसाठी संधी मिळण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या निर्धाराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनी चेन्नईत १ वर्ष अथक प्रयत्न केले. स्वाती यांनी खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. स्वाती महाडिक लेफ्टनंट पदाची शपथ घेणार आहेत