पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली काँग्रेसकडून चक्क अश्लील नृत्याचा कार्यक्रम

समाजमाध्यमांवर संताप व्यक्त

Updated: Sep 16, 2019, 01:29 PM IST
पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली काँग्रेसकडून चक्क अश्लील नृत्याचा कार्यक्रम title=

अमरावती : पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली अमरावतीत युवक काँग्रेसने चक्क अश्लील नृत्याचा कार्यक्रम घेतल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त करण्यात येतो आहे.अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात येणाऱ्या मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावात युवक काँग्रेसने भर चौकात हा कार्यक्रम आयोजित केला होता. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त कुटुबीयांना मदत देण्याच्या नावाखाली चक्क मुला-मुलींना सिनेमा गीतांवर अश्लील हावभाव करत नाचवण्यात आलं.

विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तसेच तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे छायाचित्र असलेला फलक स्टेजवर लावण्यात आला होता. गावातील शिवशक्ती गणेश मंडळाच्या मंचावर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुला मुलींच्या अश्लील नृत्याचा हा कार्यक्रम झाला. मात्र, या कार्यक्रमाशी आमचा कुठलाही सबंध नसून या कार्यक्रमाचा खर्च हा युवक काँग्रेसने केल्याचं शिवशक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.