Corona Update : या' सहा जिल्ह्यात राज्यातील 82% रूग्ण, मात्र तिसरी लाट नाही

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Updated: Oct 17, 2021, 09:16 AM IST
Corona Update : या' सहा जिल्ह्यात राज्यातील 82% रूग्ण, मात्र तिसरी लाट नाही title=

मुंबई : मुंबईत तिसरी लाट नाही असा दावा पालिकेने केला. मात्र गर्दीमुळे रोजच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. दोन महिन्यात अडीचपट रुग्णवाढ झाली आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णसंख्या सहा जिल्हांत असल्याची माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि पुण्यात आहेत. तर विदर्भात करोनाची स्थिती सर्वात चांगली असून विदर्भात कोरोनाचे केवळ 207 सक्रीय रुग्ण आहेत. सर्वाधिक ८ हजार 79 सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्यानंतर 6 हजार 255 रुग्ण मुंबईत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट देखील झाली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 1 हजार 553 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  1हजार 682 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.  तसंच राज्यात कोरोनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ऍलर्जी असणा-या व्यक्तींनी कोरोना लस घेतली तर याचे गंभीर दुष्परिणाम आढळत नसल्याचे मुंबई ऍलर्जी सेंटरने केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना कोरोना लस न देण्याच्या केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांचा फेरविचार होण्याची गरज आहे.मुंबईत २२७ रुग्णांचा अभ्यास नुकताच केला. 

लसीकरण मोहीम अधिक वेगवान बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने आता सोसायटी, बाजारपेठा, धार्मिक स्थळं आणि चौपाट्यांवर फिरत्या लसीकरणाला सुरुवात केली आहे.  अधिकाधिक मुंबईकरांचं लसीकरण व्हावं यासाठी महापालिका  सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ही विशेष मोहीम राबवत आहे.